पिंपरी चिंचवड आयटीआय मध्ये स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्री बाई फुले यांची संयुक्त जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

मावळ मराठा न्युज-पिंपरी चिंचवड, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १२ जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध स्पर्धांमधून आपली कला, कौशल्य आणि वक्तृत्वाची चुणूक दाखवली.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे रांगोळी, १०० मीटर धावणे, तंत्र प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन. यामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेतून स्वामी विवेकानंद,राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्री बाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या.कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून मीनाक्षी मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्यासह सुहास सिनलकर (COE), जगदीश मैलारफ (COE), महेश संकपाळ (COE), वैभव काकडे (FVP उद्योजक), कुणाल सावरकर, जयदीप पाटील, गणेश स्वामी (उद्योजक) आणि पोपट गव्हाणे (उद्योजक) यांनीही उपस्थिती लावली.स्पर्धांतील विजेत्यांना माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व प्राचार्य शशिकांत साबळे यांनी केले. सर्व गटनीदेशक, निदेशक, प्रशिक्षक व ३५० प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.प्राचार्य शशिकांत साबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा युवापिढीवर होणारा सकारात्मक प्रभाव सांगितला. त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचा वारसा पुढे नेत समाजात आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या भव्य आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जागरूकता, नेतृत्वगुण आणि सृजनशीलता वृद्धिंगत झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page