लायन्स क्लब ऑफ लोणावळा,खंडाळा यांनी सुरु केले काऊ ऍम्ब्युलन्स सेवा,कार्यजखमी घोड्यास मिळाले जीवनदान




मावळ मराठा न्युज :- लोणावळा लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांनी नुकतेच सुरु केलेले काऊ ऍम्ब्युलन्सचे सेवा कार्य जोरदार सुरु असून त्या माध्यमातून माघील काही महिन्यात दोन जखमी गाई यांना घटना स्थळातून हायड्रोलिक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना औषधो उपचाराकरिता दवाखान्यात पोहचिवण्यात आले. तसेच नुकतेच लोणावळा येतेल बाळूमामा मंदिर अप्पर टेक रिसॉर्ट जवळ घोडा दरीत पडून त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली होती ही बातमी समजताच शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी सादर जखमी घोडयास दरीतून बाहेर काढले त्याला ऍम्बुलन्सचे माध्यमातून उपचाराकरिता वीर सेवक या ठिकाणी पाठविण्यात आले सदर लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे काऊ ऍम्बुलन्सचे माध्यमातून मोठी व अवजड जनावरांना सेवा कार्य देण्याचे काम शिवदुर्ग मित्र क्लबचे सचिव विरल गाला तसेच त्यांचे सहकारी वीर सेवक टीम करीत असते त्या बाबतची माहिती लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष अँड प्रफ्फुल लुंकड यांनी दिली.




