रहाटणी काळेवाडी परिसरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बीट मार्शलला हाताशी धरून अनाधिकृत बांधकामांमध्ये वाढ




मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू आहे, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील काही प्रशासकीय जबाबदार अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे .अनाधिकृत बांधकाम काळेवाडी नढे नगर परिसरामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात वाढत चालल्याचं दिसून येत आहे व प्रभाग क्षत्रिय कार्यालयातील बीट मार्शल हे या अनाधिकृत बांधकामाला अभय देत असल्याचे चित्र सध्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे महापालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंह साहेब या ब प्रभागामधील बीट मार्शल ला कारणे दाखवा नोटीस देतील का? तसेच रहाटणी काळवाडी मध्ये बेकायदेशीरपणे चालू असलेल्या अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करतील का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत




