लोणावळ्यातील वाहतूक कोंडी, गड किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्याचा आय पी एस सत्य साई कार्तिक यांचा मानस


मावळ मराठा न्यूज ; लोणावळा:- लोणावळा येथील सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे स्थानिकांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास, येत्या पाऊस सुरू होण्याआधी लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी नुकतीच आपल्या कार्यालयात वाहतूककोंडी शी संबधीत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ,लोणावळा नगरपरिषद,पोलीस विभाग, वन विभाग,आय एन एस शिवाजी,रेल्वे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. दरवर्षी वर्षा विहार चा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक लोणावळा ,खंडाळा आणि परिसरात येत असतात.वाहतूक कोंडी मुळे पर्यटकांना आपला आनंद साजरा करता येत नाही त्याचा बराच वेळ वाहतूक कोंडीत गेल्याने त्याचा आनंदाचा हिरमोड होतो. लोणावळा खंडाळा येथे कुठली मोठी इंडस्ट्री नाही त्यामुळे स्थानिकांची आणि गोर गरिबांची रोजी रोटी चहा,वडापाव, मॅगी ऑमलेट पाव अशी छोट्या टपऱ्या,दुकाने ,हॉटेल ,लॉजिंग,बंगले भाड्याने देणे यावरच चालत असते.त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला तर छोट्या व्यावसायिक मोठे व्यवसिक यांचा रोजी रोटीचा आणि अनेकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल.येत्या पाऊस सुरू होण्या आधी वाहतूक कोंडी प्रश्न सुटावा यासाठी आताच त्याचे संबंधितांशी चर्चा ,बैठका,त्यावरील उपाय यासाठी आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी उचललेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. यापूर्वी देखील लोणावळा शहर पोलिस स्टेशन चे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक कोंडी साठी बरेच उपाय योजले होते,त्यामुळे बराच प्रश्न सुटला होता.परंतु पुन्हा हा प्रश्न भेडसाऊ लागला आहे.यासाठी डी वाय एसपी कार्तिक यांनी परत हा प्रश्न पोट तिडकिने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मिनू गॅरेज आणि कुमार रिसॉर्ट याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, सी सी टीव्ही बसवलेल्या भागातील नियंत्रण कक्ष पोलीस ठाण्यात करून पी ए सिस्टम द्वारे वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्याबाबत तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून रस्त्यांची डागडुजी,नगरपरिषदेकडून पार्किंग व्यवस्था बाबत काय करता येईल,दुभाजक, रिफ्लेक्टर,अजून आवश्यक अश्या ठिकाणी कॅमेरा बसविणे बाबत त्यांनी आपला मानस पत्रकार यांचेशी बोलताना व्यक्त केला. या संदर्भात पुन्हा लोणावळा नगर परिषदेत दिनांक १८ एप्रिल ला आढावा बैठक घेतली जाईल अशी माहिती सत्य साई कार्तिक यांनी मावळ मराठा न्यूज शी बोलताना दिली आहे. लोनवलेकर नागरिकांना त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. अवैध आणि बेकायदेशीर धंदे यावर बराच चाप बसला आहे. यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या माध्यमातून अनेक समस्या जाणून घेतल्या. आणि त्यांच्या मनातील शहरासाठी काय अजून करता येईल याबाबत ही आपल्या भावना आणि कल्पना देखील व्यक्त केल्या. मावळात अनेक गड किल्ले आहेत,त्या सोबतच पर्यटन स्थळी लोणावळ्यात राहणाऱ्या सिलेब्रेटी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम उपक्रम तसेच पोलीस आणि गड किल्ले प्रेमी यांची मदत घेवून त्यावर स्वच्छ्ता मोहीम राबवण्याचा त्यांचा मानस त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.




