तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त वै.सोपानराव म्हाळसकर उर्फ आण्णा सामाजिक आदरांजली म्हणून उद्या रक्तदान शिबिर

मावळ मराठा न्युज :- तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त , वडगांव चे मा.सरपंच ” वै.सोपानराव बाबुराव म्हाळसकर उर्फ आण्णा “वय वर्षे ८२ यांचे रविवार दिनांक २१/४/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.कै.आण्णांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली आणि एक समाजोपयोगी उपक्रम म्हणून उद्या रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरामध्ये म्हाळसकर परिवारातील ८२ जण रक्तदान करणार असून परिवाराचे सर्व नातेवाईक आणि मित्र परिवार यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे आणि या पवित्र कार्यात सहभागी व्हावे ही विनंती.स्थळ- कै. बाबुराव श्रीपती म्हाळसकर नगर , माय कार शोरुम शेजारी , वडगांव फाटाटीप- आपल्या सुरक्षिततेसाठी म्हाळसकर परिवारातर्फे प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात येईल.संपर्क:- संतोष – ९८५०५४०४८०निलेश – ९८२२७९४६८०संदीप – ९९२२३४८१४८चंद्रशेखर – ९८२२२६४०२७अतुल – ९५५२९६८००९

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page