टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हर्षल असवले आणि राधिका माळी यांचे गुणवत्ता यादीत स्थान







मावळ मराठा न्युज – मावळ,आंदर मावळातील टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने नेहमीच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आपला ठसा उमटवला आहे सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता ५ वी चे १९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तसेच त्यापैकी २ विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये स्थान पटकावले आहे. इयत्ता पहिलीपासूनच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी शाळेत करून घेतली जाते या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमारी हर्षल विकास असवले २५८ गुण व कुमारी राधिका शांताराम माळी २४६ गुण ह्या शिष्यवृत्तीसाठी धारक ठरल्या. प्रत्येकी ५००० रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच पाचवीच्या वर्गाला मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक श्री अतुल माधव गायकवाड व सौ रुपाली अतुल गायकवाड यांनी वर्षभर सुट्टीच्या कालावधीमध्ये वर्ग चालू ठेवले. मा. केंद्रप्रमुख मा. विस्तार अधिकारी मा गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी मार्गदर्शन केले. तसेच टाकवे बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच श्री अविनाश असवले व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संदीप मालपोटे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. यावेळी श्री विकास असवले व सौ सारिका असवले श्री शांताराम माळी, सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम चारुशीला सोनवणे मॅडम यांनी केले. आभार सौ संगीता शेखरे मॅडम यांनी मानले.




