शेखबाबा ट्रस्टच्या वतीने रमजान किट् व साडी वाटप

मावळ मराठा न्यूज:- पिंपरी(प्रतिनिधी) निगडी यमुनानगर येथील शेखबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रमजान महिन्यानिमित्ताने गरिब महिलांना रमजान कीट चे वाटप करण्यात आले.यावेळी माजी मारुती भापकर, माजी नगरसेविका कमल घोलप, आप च्या महिला अध्यक्ष स्मिता पवार, बहुजन विकास आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वैशाली पवार,प्रसाद कोलते,शेखबाबा ट्रस्टचे अध्यक्ष आलमबाबा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.महिन्याभरात एक हजार कुटुंबियांना शिरखुरमा साहित्य आणि विधवा महिलांना साडी वाटप करण्यात आले. निगडी आकुर्डी परिसरातील गरीब मुस्लिम बांधव लाभ घेतात. दुसऱ्या दिवशी शिवसेना( ठाकरे गट) नेत्या सुलभा उबाळे,सचिन सानप,ज्येष्ठ समाजसेवक वासुदेव म्हसवडे, सौ.परदेशी, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष लालूभाई शेख, सचिव सुर्यकांत पवार, फारुख शेख उपस्थित होते. तिसऱ्या दिवशी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम,माजी नगरसेवक आप्पा बागल,दत्ता पवळे,उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे,प्रियांका कोलते, रेशमा साळवी, सविता पॉल, कॉंग्रेसच्या चिंचवड विधानसभा माऊली मलशेट्टी,झेव्हियर ॲंथनी,हुसेन जमादार,मौलवी मुशर्रफ शेख, ट्रस्टचे अध्यक्ष बाबाआलम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page