राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा








मावळ मराठा न्युजनेटवर्क – राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने दि. १९ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष मा. श्रीपाल सबनीस सर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक मा. श्री. विजयकुमार जयशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दरवर्षीप्रमाणे उद्योगपती मा. आप्पा काळोखे यांना “यमुनानगर भूषण” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आप्पा काळोखे देहू गाव मातीतील आदर्श वारकरी धार्मिक आणि सामाजिक संस्थांना सढळ हाताने आर्थिक मदत करणारे जनमानसात मानाचे स्थान मिळवणारे सदा हसतमुख व विनयशील आप्पा काळोखे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच पिं. चिं महानगरपालिके चे विरोधी पक्षनेते श्री. भाऊसाहेब भोईर यांचा सत्कार करण्यात आला व प्रभाग क्रमांक १३ चे नवनिर्वाचित सदस्य सौ. सुलभाताई उबाळे, श्री. बापूशेठ घोलप, श्री. उत्तम केंदळे आणि सौ. अर्चना कारंडे यांचा सत्कार करण्यात आला. यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले यांची पिंपरी चिंचवड शहर जेष्ठ नागरिक महासंघ सचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस सर यांनी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर विचार प्रवर्तक व्याख्यान देऊन उपस्थिताना मार्गदर्शन केले सौ शोभा घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांनी व महिलांनी शिवचरित्रातील प्रसंग मोठ्या उत्साहात सादर केले सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र घोडके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचे अध्यक्ष श्री. अंकुश जगदाळे, पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव श्री. ढमाले काका, संयोजक समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र चित्ते, उपाध्यक्ष श्री. दीपक वाणी, कार्याध्यक्ष श्री. दत्तात्रय मेमाणे आणि श्री. भरत डोके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.



