लोणावळ्यातील स्कायवाकसाठी प्रस्तावित वृक्षतोडीच्या संदर्भातील सुनावणीत निसर्ग प्रेमी,तज्ज्ञ यांची कमिटी गठीत करून पीएम्आरडीए सोबत लवकरच बैठक घेऊन जास्तीत जास्त झाडे वाचवली जातील- अशोक साबळे

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण सुनावणी आज बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १२ वाजता लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे याचे समोर लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष नासीरभाई शेख यांच्या हरकती वर घेण्यात आली.या सुनावणीमध्ये वृक्षतोडीबाबत नागरिकांच्या हरकती,पर्यावरणाचा प्रश्न आणि प्रस्तावित विकासकामासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी लवकरात लवकर निसर्ग प्रेमी,तज्ज्ञ,आर्किटेक्ट यांची समिती गठन करून त्यांच्या सोबत पीएम आरडीए आणि त्यांची एक्सपर्ट टीम याचे सोबत एक स्वतंत्र बैठक घेऊन त्यावर चर्चा करून निसर्गाचा ऱ्हास होणार नाही आणि जास्तीत जास्त जुनी आणि मोठी झाडे कशी वाचवता येतील यावर लोणावळा नगरपरिषद निश्चित प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता पंढरीनाथ साठे,आणि नासिरभाई शेख आणि त्यांचा सोबत गेलेल्या लोणावळ्यातील सुनील यादव,दिनेश राणावत,नितीन कल्याण,रवि सलूजा, ऑक्सिलीयम शाळेतील शिक्षिका, पत्रकार श्रीराम कुमठेकर,ऍड संजय पाटील,विशाल विकारी,सुनील म्हस्के आणि झाडे वाचवा,सुरक्षित झाडे,सुंदर लोणावळा,हरित लोणावळा चे जागृती करण्यासाठी आलेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page