विधूरा सुधाकरन यांनी एकपात्री नाट्यप्रयोगातून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

मावळ मराठा न्यूज:-पिंपरी (प्रतिनिधी) मल्याळी नाट्यकलावंत विधूरा सुधाकरन यांनी केरलाभवन येथे एकपात्री नाट्यप्रयोगातून राष्ट्रीय एकात्मता,पर्यावरण,महिला सुरक्षिततेचा संदेश दिला.यावेळी चिंचवड मल्याळी समाजमचे (सीएमएस) अध्यक्ष टी.पी. विजयन, सरचिटणीस सुधीर सी. नायर, कोषाध्यक्ष पी. अजयकुमार, कलामंदिराचे प्रमुख पी. व्ही भास्करन, जी. करुणाकरन, जॉय जोसेफ, जी.एस. नायर, पी. श्रीनिवासन, फॅन्सी विजयन, प्रवीण पणिकर, इतर समिती सदस्य, सीएमएस सदस्य, लेडीज विंग सदस्य, इतर मल्याळी समाजाचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.सुधाकरन हे केरळ ते कन्याकुमारी पर्यंत ड्रामा ऑन व्हिल्स या अंतर्गत दुचाकीवर भारतभ्रमण करीत ठिकठिकाणी आपली कला सादर करीत आहे. सीएमएस च्या वतीने एकपात्री कलावंत विधुरा सुधाकरन यांचा केरलाभवन आकुर्डी येथे सत्कार करण्यात आला.यातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने कलावंत सुधाकरन हे राष्ट्रीय एकात्मता, याशिवाय पर्यावरण, महिला सुरक्षितेचा संदेश देत आहे.यांच्या या एकपात्री प्रयोगाची नोंद जागतिक रेकॉर्ड बुकमध्ये झालेली आहे.त्यांनी मराठी, मल्याळी, हिंदी, बंगाली, आसामी, पंजाबी, गुजराथी, कन्नड, तेलुगू, ओरिया, कोकणी, काश्मिरी अशा १२ प्रादेशिक भाषेत आपली कला सादर करून तेथील संस्कृतीचे दर्शन घडवले.सूत्रसंचलन सुधीर सी. नायर यांनी तर आभार पी. अजयकुमार यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page