अँटी करप्शन ब्युरो पुणे आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा सत्र

मावळ मराठा न्युज :- खंडाळा,आज ता. ०९/१०/२०२४ अँटी करप्शन ब्युरो पुणेचे श्री पी आर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा येथील शासकीय विश्रामगृह येथे अँटी करप्शन ब्युरो पुणे आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने भ्रष्ट्राचारा ला आळा घालण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी काय काय पाऊले उचलायची यावर चर्चा करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मावळ तालुका संघटक दत्तात्रय निकम व मावळ तालुका पालक श्री श्रीपत मारुती थोरात व मावळ तालुका कोषाध्यक्ष श्री रवींद्र कुलकर्णी यानी अँटी करप्शन ब्युरो पुणे चे पोलीस निरीक्षक पी आर वाघमारे आणि सहकारी यावेळी उपस्थित होते. समाजात भ्रष्ट्राचार एवढा वाढला आहे महसूल विभाग,उत्पादन शुल्क विभाग,पोलीस,पालिका प्रशासन चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच करत नाहीत.भ्रष्ट्राचार म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे.यासाठी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. जेष्ट समाज सेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्ट्राचार निर्मूलन साठी आपले संपूर्ण आयुष्य घालवले आहे.त्यासाठी प्रशासन आणि नागरीक यांच्यात पारदर्शकता यावी यासाठी ग्रामसंसद,ग्रामसभा,माहिती अधिकार असे अनेक कायदे केलेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page