इस्लाम भारतात सुरक्षित,हिंदू-मुस्लीम ऐक्य देशाच्या विकासासाठी आवश्यक, राजकीय पक्षांनी विवेक बाळगावा – मोहन भागवत


मावळ मराठा न्यूज :- नागपूर,सरसंघचालक मोहन भागवत हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने देशातील धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक सौहार्दाविषयी भूमिका मांडताना दिसत आहेत. गुरुवारी नागपुरात रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांनी देशातील धार्मिक स्थिती आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक घटनांचेही दाखले दिले. “भारतात लोकशाही असल्यामुळे राजकीय मतभेद,सत्तेसाठी स्पर्धा, परस्परांवर टीका होणारच. मात्र, सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेत विसंवाद निर्माण होणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा”,असा सल्ला भागवत यांनी राजकीय मंडळी बद्दल बोलताना दिला.अजूनही जे लोक त्या बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली आहेत, तेही बाहेरचे नसून आपलेच आहेत,असं समजून त्यांच्याशी आपण चांगलं वर्तन करायला हवं. जर त्यांच्या विचार करण्यात काही कमतरता आहे, तर त्यांचं प्रबोधन करणं ही आपली जबाबदारी आहे”, असं मोहन भागवत यांनी नमूद केलं. मोहन भागवत यांनी यावेळी हिंदू-मुस्लीम ऐक्य देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. “काही संप्रदाय बाहेरून आले होते. त्यांना आणणाऱ्या बाहेरच्या लोकांशी आपल्या लढाया झाल्या. पण आता ते बाहेरचे आक्रमक लोक निघून गेले आहेत. आता सगळे आतले लोक आहेत. त्यामुळे त्या बाहेरच्या लोकांचे संबंध विसरून या देशात राहा असे ही भागवत यांनी सांगितले.




