लोणावळ्यात पुणे ग्रामीण पोलीस आयोजित संकल्प नशामुक्ती मॅरेथॉनला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,पुणे ग्रामीण पोलीस आयोजित ” संकल्प नशामुक्ती मॅरेथॉनला ” लोणावळा येथे प्रचंड प्रतिसाद, या मॅरेथॉन ला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र,कोल्हापूरचे सुनील फुलारी ,पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील शेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आणि ज्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली ते लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांच्या या संकल्पना मांडत परिसरातील गुन्हेगारी, अवैध धंदे बंद करत गड किल्ले आणि परिसरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे स्वच्छ करण्याचे काम सत्य साई कार्तिक यांनी सुरू केले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. समाजातील तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सदर मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.या पाच हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला,सिनेअभिनेता सुनील शेट्टी हा या कार्यक्रमाचे आकर्षण होता.यावेळी लोणावळा उप विभागातील सर्व पोलीस निरीक्षक ठाणे अंमलदार आणि पोलीस बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात परिसतील शाळा, महाविद्यालय,सामाजिक संस्था, लोणावळा शहर पत्रकार संघ,वकील डॉक्टर्स,जेष्ठ नागरिक लहान मुले आदीनी सहभाग नोंदवला,यावेळी चार गटांत लकी ड्रॉ काढून विजेत्यांना चार सायकली भेट देण्यात आल्या. सदर कार्यक्रमात विविध संस्थांनी आर्थिक सहकार्य करून प्रायोजकत्व घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page