तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित-” जी एन एम या”- नर्सिंग कोर्स संपादित विद्यार्थ्यांचा अभिष्टचिंतन शुभेच्छा सोहळा संपन्न



मावळ मराठा न्यूज़ तळेगाव,शनिवार दिनांक ११. ११. २०२३ या दिवशी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या रिक्रेशन हॉलमध्ये प्राचार्य मोनालिसा यांनी दीप प्रज्वलनानंतर उपस्थितांचे स्वागत केले. जी एन एम नर्सिंग कोर्सच्या २०२० -२३ या तीन वर्षात आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि सेकंड फर्स्ट वर्षातील विद्यार्थ्यांनी गायन नृत्य आणि चल चित्रपटातून संस्थेच्या प्रति असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या.रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असते हा संदेश आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय अनुभवातून प्रमुख पाहुणे डॉ शाळीग्राम भंडारींनी अत्यंत संवेदनशील शब्दात नर्सिंग क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक उदाहरण देऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्यात. या अत्यंत देखण्या, प्रसन्न समारंभाचे पूर्ण आयोजन नर्सिंग स्कूलच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेऊन केले. त्यात उत्कृष्ट फोटोग्राफी परमेश्वर राठोड ,साऊंड सिस्टिम प्रफुल्ल लोंढे, विद्यार्थी आणि संस्थेविषयी अत्यंत तरल शब्दातील आपली मनोगते सादर केलीत. त्यात कुमारी विशाखा निकम, श्री शिवम माने, प्रतीक्षा दौंडे स्नेहा म्हात्रे आणि धनश्री इताम भाग घेतला होता तर आभार प्रदर्शन कुमारी श्रुती चव्हाण यांनी तर समारंभाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रुती कदम आणि निशिगंधा यांनी केले. अल्पपोपहाराने या शुभेच्छा समारंभाची सांगता झाली.




