ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे जागतिक योग दिन व संगीत दिवस उत्साहात साजरा

मावळ मराठा न्यूज़, लोणावळा – लोणावळा येथील ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल मध्ये नुकताच जागतिक योग दिन व संगीत दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी योग दिनाचे औचित्य साधत योगासंबंधी नृत्य सादर केली.वेगवेगळी योगासने व सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके दाखवत विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील महत्व सांगण्यात आले. यावेळी कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे संजय पुजारी यांनी विद्यार्थ्यांना २१जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.संगीत या विषयाचे जीवनातील महत्व सांगत विषद केले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल साळवे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले,प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका माधवी थत्ते त्याचबरोबर विद्यार्थ्यी व शिक्षक मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी योगासने सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती करकेरा व रूबीना खान तर योगाची प्रात्यक्षिके नम्रता शिर्के सरोज कुंभार चिन्मय जगधनी व प्रमोद अंगरखे यांनी विद्यार्थ्यांसमवेत सादर केली. स्मिता वेदपाठक व नम्रता शिर्के यांनी आभार मानले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page