शेखबाबा ट्रस्टकडून १२२० महिलांना शिरखुर्मा कीटचे वाटप


मावळ मराठा न्युज :-पिंपरी(प्रतिनिधी) निगडी यमुनानगर येथील शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १२२० गरजू महिलांना शिरखुर्मा कीट आणि ३०० महिलांना साडी वाटप करण्यात आले.पाच दिवस आयोजित कार्यक्रमात पहिल्या दिवशी ज्येष्ठ कार्यकर्ते मानव कांबळे, छावा संघटनेचे धनाजी येळकर , सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोलते, सुनील राणे,प्रिया कोलते,रेश्मा साळवी,सुरेखा फड,ट्रस्टचे अध्यक्ष बाबा शेख,समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.दुसऱ्या दिवशी माजी नगरसेवक सचिन चिखले,उत्तम केंदळे, युवराज कोकाटे, तानाजी शिंदे तर तिसऱ्या दिवशी माजी नगरसेविका सुलभा उबाळे, शशिकला उभे, सोमनाथ शिर्के,कावेरी परदेशी, वैशाली शिंदे, रमणलाल बाटलीवाल, हुसेन जमादार,जरिना खान आदी उपस्थित होते.चौथ्या दिवशी माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, चिखली येथील शाही जामा मस्जीदचे फिरोज शेख, जुलूस समितीचे अध्यक्ष युसुफ शेख,आम आदमी पक्षाच्या महिलाध्यक्ष सरोज कदम, स्मिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.पाचव्या दिवशी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेविका सुमन पवळे,शशीकिरण गवळी,तानाजी खाडे, ज्योती गोफणे,सोमनाथ शेळके मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आलम शेख तर आभार समीर शेख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिकेत वाघमारे,मनोज शेलार,सोहेल शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.




