मावळात सुरू झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये इनकमिंग,शिंदे गटाचे तळेगाव शहरप्रमुख यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

मावळ मराठा न्यूज :-शिंदे गटाचे तळेगाव शहराचे‌ विद्यमान शहरप्रमुख श्री दत्तात्रय भेगडे व तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री शंकर भेगडे यांनी आज सहकार्यांसमवेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार मा श्री सचिनभाऊ आहिर व शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा आमदार ॲड गौतम चाबुकस्वार, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहर शिवसेना‌ भवन येथे पक्षप्रवेश केला.या‌ पक्षप्रवेश कार्यक्रमास मावळ उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड सचिन भोसले, महिला आघाडी मावळ लोकसभा संपर्क संघटीका सौ लतिकाताई पाष्टे, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटीका सौ शैलाताई खंडागळे, रोमी संधु आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page