इंडीयन रॉक पायथन जातीचा अजगर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने सुखरूप जंगलात सोडला


मावळ मराठा न्यूज़ वडगाव मावळ;-दिनांक ८ .११ .२०३० रोजी पिंपळोली गावातील शेतकरी पांडुरंग बोंबले गुरे चारण्यासाठी रानात गेले असता त्यांच्या गोठ्याजवळ झुडपात त्यांना अजगर जातीचा साप आढळला त्यानी ताबडतोब वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद काली केदारी, अविनाश केदारी यांना फोन केला त्यांनी ताबडतोब जागेवर जाऊन पहाणी केली असता इंडीयन रॉक पायथन जातीचा अजगर आढळला त्यांनी वन्यजीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्याशी संपर्क साधला सविस्तर माहिती घेतल्यानंतर साप हा मानव वस्ती जवळ असल्यामुळे वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना माहिती देऊन त्या अजगरास रेस्कु करून त्यांची प्राथमिक तपासणी करून आध्यक्ष अनिल आंद्रे तसेच सदस्य काली केदारी. दक्ष काटकर.अविनाश कदारी. संतोष दहिभाते. लोकेश धुमाळ जागर सोळंकी यांनी मिळून वन विभागाने सांगितलेल्या जागेमध्ये जाऊन सोडण्यात आले.




