कौशल्य विकासातून आर्थिक सक्षमतेकडे-संतोष गुरव,करिअर समुपदेशक

मावळ मराठा न्युज, आकुर्डीः- पारंपरिक शिक्षणात ५-७ वर्ष घालवल्यानंतर नोकरीसाठी वणवण भटकत आली तरुण पिढी आज आपण सर्वत्र बघतो आहोत.बेरोजगारी वाढली की सरकार च्या नावाने आरडाओरड केली की त्यातून मार्ग निघेल असे नाही. वस्तुस्थिती पुर्ण वेगळीच आहे.आजही पिंपरी चिंचवड एम.आय.डी.सी.ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अग्रगण्य अशी औद्योगिक वसाहत आहे ,तिथे कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासते आहे. कारण उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही एकीकडे बेरोजगारी वाढते आहे,शिक्षणाचा बाजार झालाय ,युवक नैराश्यात अशी तक्रार करणारे युवक हात काळे करायला,कष्टाची कामे करायला,कौशल्य विकास करुन स्वंयरोजगार कडे वळायला तयार होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आज महाराष्ट्रातील कोणत्याही औद्योगिक वसाहतीत कष्टकरी, कामगार हे परप्रांतीयच दिसतील जे फारसे कुशल नाहीत पण नाईलाजास्तव त्यांना कामावर घ्यावेच लागते. त्यांची कष्टाची कामे करण्याची,नवीन काहीही शिकण्याची वृत्ती हे त्यामागील खरे कारण आहे. महाराष्ट्रातील तरुणांना व्हाईट कॉलर जाॅब हवेत, फक्त ८तास काम पाहिजे,कंपनीच्या,आस्थापनेच्या गरजेनुसार जादा कामासाठी थांबायला तयार न होणे आणि सर्वात महत्वाचे कौशल्य प्राप्त व्यावसायिक शिक्षणाबद्दलची अनास्था असल्याने हातात फक्त कागदपत्रांच्या भेडोंळ्या घेऊन ऑफीस वर्क शोधणे. आय.टी.आय.सारख्या कौशल्य वृद्धिंगत करणार्या क्षेत्राकडे तरुणांचा कल वाढताना दिसतोय,पण ते स्वयं प्रेरणेने तिथे येताना दिसत नाहीत.मार्क कमी पडलेत, Diploma ला ॲडमिशन मिळत नाही,आर्ट साईड ला जाण्यापेक्षा आय.टी.आय.करु असा कॅज्युअल ॲप्रोच असतो.त्यामुळे गळती चे प्रमाण जास्त आहे तसेच आय.टी.आय.पुर्ण केल्यानंतरही त्याच क्षेत्रात काम करण्यासाठी तयार होत नाहीत.औद्योगिक क्षेत्रात सुरुवात करताना पगार कमी मिळतो कारण तुमची कुशलता,अनुभव.जसजसे तुमचे कौशल्य व अनुभव वाढेल तशी पगारवाढ होतंच असते.पण long term Vision ची आजच्या तरुणाईची मानसिकता Instant Food च्या जमान्यात पैसाही Instant हवा आहे.मग मोबाईल शाॅपी,डिलेव्हरी बाॅय व तत्सम काम करुन अल्पकालीन खुष रहाणारी ही पिढी आहे याची खंत आहे.कौशल्य असेल तरच कौतुक(पैसा व त्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा )होईल……. कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी आय.टी.आय.हा सुवर्ण मार्ग आहे.कंपन्या पर्मनंट करत नाहीत मग हंगामी काम करुन भविष्य घडते का? हा प्रश्न करणार्यांनी आधी ही अवस्था का आली याचा विचार करावा.हाताला काम नसण्यापेक्षा काम आहे व ते ईमानदारी,सचोटी व सातत्याने केले तर कायम होण्याची संधी आजही आहे.श्रमाला,श्रमकर्यांना प्रतिष्ठा मिळेल तेव्हाच या देशातील बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page