महिमा वेलनेस मंत्रा कडून योग शिबिर,तन-मन आत्मा निरोगी राहण्यासाठी निसर्गाशी नाते जोडा- अजय शर्मा


मावळ मराठा न्युज :- पिंपरी (प्रतिनिधी) आधुनिक काळात दैनंदिन जीवन जगताना तन- मन आणि आत्मा यांना यांना निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाशी नाते जोडले पाहिजेत.कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजेत. आपण उत्तम आहार,विहार ,आचार, विचार आचरणात आणले पाहिजेत.असे मत योगा महिमा वेलनेस मंत्राचे संचालक अजय शर्मा यांनी व्यक्त केले.जयहिंद चौक येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या महिमा वेलनेस मंत्राच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत योगा शिबिरात ते बोलत होते. यावेळी उद्योजक श्रीचंद आसवाणी,महाराजा केबल ॲंड मल्टिमीडियाचे संचालक अरुण शर्मा,उद्योजक विजय आसवाणी,कमलेश भोजवाणी, महिमा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. अजय शर्मा पुढे म्हणाले कि, औषधमुक्त जीवन जगण्यासाठी सुजोय थेरपी,कायरोप्रॅक्टिक(बोन बॉडी अलॉयमेंट), ध्यान धारणा, कपिंगथेरपी,ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, साउंड हीलिंग अशा थेरपी करण्यावर भर दिला पाहिजेत. निरोगी राहण्यासाठी निसर्गाने सभोवतालच्या परिसरात सर्व काही दिलेत मानव शोधत नाही म्हणजेच तुझ आहे तुझंपाशी परि तू जागा चुकलाशी अशी अवस्था झाली.




