लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे अध्यक्षपदी ॲड.प्रफुल्ल लुंकड


मावळ मराठा न्यूज़, लोणावळा:- लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा अध्यक्षपदी ॲड.प्रफुल्ल लुंकड यांच्या शपथ ग्रहण सोहळा नुकताच लोणावळा येथील नारायणी धाम येथे उत्साहात पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे येथील फॅमिली कोर्ट चे मुख्य न्यायाधीश श्याम एन रुक्मे तर एमजेएफ लायन राज मुछाल यांनी शपथ दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव श्रीधर पुजारी उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यात नितीन अग्रवाल यांना सेवा सद्भावना पुरस्कार तर जीवदया हा संदेश देणाऱ्या येथील वीर सेवक संघटनेच्या विशाल सांकला आणि टीमला गौरविण्यात आले. सदर प्रसंगी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सन्मान म्हणून छत्री भेट देण्यात आली. रक्तदात्यांना भिंतीवरील घड्याळाचे लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा च्या वतीने वाटप करण्यात आले. नव निर्वाचित अध्यक्ष लायन ॲड प्रफुल लुंकड यांनी गंजन्या पेक्षा जीझने बरे हा समाजात काम करणाऱ्या मान्यवरांना दिला.यावेळी वीरेंद्र पारेख यांनी जीवदया साठी रोख रक्कम जाहिर केली.यावेळी एमजेएफ लायन राज मुछाल यांनी नवनिर्वाचित कार्यकारणी अध्यक्ष प्रफुल लुंकड ,सचिव विरल गाला ,खजिनदार प्रकाश जैन ,यावेळी वरिष्ठ सदस्य लायन अभय जैन , दिलीप सुराणा ,पोपट ओसवाल ,वीरेंद्र पारीख ,श्री व् सौ मनोज लुंकड ,श्री व सौ देवेंद्र नालेकर,श्री व् सौ लुनावत ,संदीप कोरड श्री व् सौ पारेख ,श्री व् सौ देवल पारेख ,मंगेश कदम जिगर पटवा आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरुची खंडेलवाल यांनी तर आभार प्रदर्शन लायन अमित लूनावत यांनी केले




