इंदोरी ते कुंडमळा या रस्त्याची अवस्था दिवसें दिवस अतिशय दयनीय, प्रशासन याकडे लक्ष देईल का ? नागरिकांचा सतंप्त सवाल

मावळ मराठा न्यूज़ ,इंदोरी ते कुंडमळा या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे . या रस्त्यावरून सांगुर्डी, इंदोरी,जांबवडे कुंडमळा,कानेहवडी ग्रामस्थांची ये जा होत असते. त्याचबरोबर प्रगती हायस्कूल, सरस्वती शाळा आणि चैतन्य इंटरनॅशनल स्कूल अशा तीन शाळा या रस्त्यावरती येत आहेत. मुलांचा प्रवास या रोडवरती होत असताना काही अनर्थ तर घडणार नाही ना अशी भीती नागरिकांमधे आहे .आणि असा अनर्थ झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत . प्रशासन अशी घटना घडावी म्हणून वाट पाहत आहे का? असा ही सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत . प्रशासनने ग्रामस्थांच्या अडचणींचा विचार करूंन रोडवरची वाहतुकीसाठी रस्त्याची चांगल्या प्रकारची सुधारणा होणे गरजेचे आहे .या कामी संबंधित विभागाने लक्ष घालावे आणि लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करूंन अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page