लोणावळा व् परिसरातील गरजू महिलाना प्रमोद जव्हेरी फॉउण्डेशनच्या वतीने २५ शिलाई मशिनचे वितरण


लोणावळा:- येथील महिला मंडळ हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात लोनावला शहर व् परिसरातील होतकरू आणि गरजू महिलाना येथील प्रमोद झव्हेरी फॉउंडेशन च्या वतीने सिंगर शिलाई मशीन चे वितरण लोनावला नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव ,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,फॉउंडेशन च्या अध्यक्षा फाल्गुनी जव्हेरी,सदस्य चंद्रकांत नाइक ,प्रताप पंडित जिंजर दवे,अर्जुन पठारे,योगिता कोकरे ,अरुण लाड कल्पना काकड़े,रेशमा शेख ,जेष्ठ नागरिक संघाचे पांडुरंग तीखे , चारुलता कमलवर ,सुजाता मेहता , आशा सेवा केंद्राच्या मेरी मैडम,रचना सिनकर जयश्री काले,विजय सिनकर ,नंदू जोशी ,प्रफुल काकड़े अनवर निंबर्गी ,हर्षल होगले आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फॉउण्डेशनच्या अध्यक्षा फाल्गुनी जव्हेरी यांनी सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी यांनी मला महिलांना सबल करण्या साठी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले .महिलांनी महागाई च्या जमान्यात सक्षम होने गरजेचे असल्याचे सांगत फॉउंडेशने ग्रामीण व् गरजू महिलाना स्वताचे असे उपजीविकेचे साधन दिल्याने अध्यक्षा फालगुनी जव्हेरी यांचे आभार मानले .सुरेखा जाधव यांनी आपण करीत असलेल्या महिला सबलीकरण साठी आम्ही सैदेव तुमच्या पाठीशी राहु अशी ग्वाही दिली .शिलाई मशीन मिळालेल्या महिलांच्या चेहररयावर वेगळाच आनंद दिसत होता.यावेळी अनेक मान्यवरांनी फॉउंडेशन च्या कामाची स्तुति करत भावी वाटचालिस शुभेछा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्तविक,सूत्रसंचालन ,आभार सुरेखा जाधव यानी मानले




