सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आर्दशनगरमध्ये रावेत स्वातंत्र्य दिन साजरा



मावळ मराठा न्युज :-पिंपरी,स्वतंत्र दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला आपल्या भागातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक श्री. अहमद तांबोळी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शिवसेना शहर अध्यक्ष श्री.निलेश तरस, मा.नगरसेवक श्री.बाळासाहेब ओव्हाळ व सामाजिक कार्यकर्ते श्री.दिपक भोंडवे उपस्थित होते. सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सुदाम दिवटे याचे सुचवल्याप्रमाणे श्री.निलेश भाऊ तरस यांनी ध्याजारोहन केले.त्यांचे हस्ते ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे आपल्या भागातील माजी सैनिकांचा तसेच सैन्य दलात कार्यरत असताना शहीद जवानाची विरपत्नी श्रीमती.लक्ष्मी दादासाहेब पवार यांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री.साहेबराव पाटील यांनी संघाच्या स्थापनेस आज एक वर्ष पूर्ण होत असल्याचे सांगून संघाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.तर माजी सैनिकांची पत्नी सौ.रूपाली रघुनाथ सातव यांनी सैन्य दलातील जवानांच्या कार्याचा उल्लेख केला.तसेच इतर मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमात श्री.जयस्वाल शिवकांत, श्री.उपासनी विजय, ,भोलंनकर मुरलीधर,या ज्येष्ठ सभासदांनी देशभक्ती गीतांचे गायन केले. तर महिला व लहान मुलांचे गायन व नृत्याचे कार्यक्रम घेण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संघाचे पदाधिकारी व सभासदांनी केले होते. संघाचे सीकृत संचालक श्री. सुरेश बडगुजर सर यांनी या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन केले. तर सचिव श्री.रमेश थोरात यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांचे आभार व्यक्त केले.




