नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मावळ मराठा न्यूज़ :-तळेगाव ,स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडीयम स्कूलच्या अध्यक्षा सौ रजनीगंधा संतोष खांडगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना सौ रजनी खांडगे यांनी विद्यार्थ्यांना- आपलं भविष्य म्हणजे देशाचे भविष्य आहे या दृष्टीने आपण आपला स्वतःचा सर्वांगीण विकास करावा, एवढेच नव्हे तर गुरुजन वर्ग, वडीलधारी आणि मात्यापित्यांचा नेहमीच आदर करावा असा संदेश विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक वक्ते डॉक्टर भंडारी यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम समर्थ विद्यालय हे प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय यश सातत्याने संपादन करीत आलेले आहे म्हणून शिक्षकांच आणि विद्यार्थ्यांच मनःपूर्वक अभिनंदन केलं. १५ ऑगस्टच्या या शुभमुहूर्तावर प्रत्येक विद्यार्थ्याने एक संकल्प सोडण्याच वचन डॉक्टरांनी विद्यार्थ्यांकडून घेतलं. अभ्यासा व्यतिरिक्त- संगीत कला- नृत्य कला- चित्रकला किंवा क्रीडा क्षेत्रातील कुठलीही कला यात आपण प्राविण्य मिळवलंच पाहिजे. कारण कोणालाही अर्थपूर्ण जीवन अपघाताने मिळत नाही ते योजनापूर्वक प्राप्त कराव लागत. विद्यार्थ्यांना आपलं आणि पर्यायाने आपल्या देशाचं उज्वल भविष्य घडवण्यासाठी संकल्प सिद्धीचा एक साधा ,सरळ, सोपा मार्ग विद्यार्थ्यांनापुढे डॉक्टरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सुचवला . समर्थ विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक साहाय्य करावं असं आवाहन भगवान शिंदे यांनी आपल्या मनोगतातून केलं. शालेय समितीचे अध्यक्ष श्री महेशभाई शहा, ,श्री दीपक बाळ सराफ ,श्री भगवान शिंदे, श्री सुदाम वाळुंज, माजी मुख्याध्यापिका श्रीमती इरावती केतकर ,सौ सीमा गावडे ,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य श्री शंकर नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत यांचे सामुदायिक गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री रेवाप्पा शितोळे यांनी केले.मान्यवरांचे आभार विद्यालयाच्या प्राचार्या सौ वासंती काळोखे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रभा काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page