लाडक्या बहिणीना त्रासदायक ठरणारी देशी दारूचे लायसनबाबत सरकारचे धोरण स्पष्ट करा-भारतीय जनसंसद



मावळ मराठा न्युज नेटवर्क -दिनांक २५ डिसेंबर २०२४ च्या वृत्तपत्रात राज्याची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राज्यात १९७२ पासून देशी दारूचे परवाने देणे बंद आहे ते पुन्हा देणे सुरू करावे अशी सूचना अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केल्याची बातमी आहे.लाडकी बहीण योजनेत होणारी तूट भरून काढायला लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करणारी देशी दारू वाढवून पैसा उभा करण्याची अधिकाऱ्यांची ही मानसिकता अत्यंत नीच आणि संतापजनक आहे..आज देशी दारूचे ग्राहक हे गरीब माणसे असतात. खेड्यातील कष्टकरी व शहरी झोपड पट्टीतील गरीब लोक ही देशी दारू पितात. त्यातून महिलांना मारहाण अत्याचार होतात. अनेक महिलांचे खून झालेत. अपघात आणि गुन्ह्यात आरोपी दारू पिलेले असतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे…काल डंपरने गरीब चिरडले तो चालक दारू पिलेला होता.त्यामुळेच यापूर्वीच्या सर्व प्रकारच्या सरकारांनी विदेशी दारूचे लायसन वाटले पण गरीबांचे संसार उद्ध्वस्त करणारी देशी दारू लायसन महाराष्ट्रात वेगवेगळ्या पक्षांची इतकी सरकारे ५२ वर्षात आली पण लायसन दिली नाहीत.पण आज इतकी उधळपट्टी केल्यानंतर सरकार या कारकिर्दीची सुरवात जर देशी दारू परवाने वाटून करणार असेल तर हे संतापजनक आहेएकीकडे लाडकी बहिण हा जप करायचा, त्यांनी सरकार आणले म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांना पैसे देण्यासाठी गरीबांचे संसार उद्ध्वस्त करणारी दारू विकून पैसे आणायचे हे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे…तेव्हा उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करून देशी दारूचे परवाने पुन्हा सुरू करणार का ? हे सांगितले पाहिजे. त्याचबरोबर या महिलांचे भाऊ देवाभाऊ व एकनाथ भाऊ यांनीही भूमिका स्पष्ट केली पाहिजे…बंगलोर येथील प्रसिद्ध NIMHAN या संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्टपणे मांडले आहे की दारुतून सरकारला जितके उत्पन्न मिळते त्यापेक्षा जास्त रक्कम ही सरकारला दारुतून निर्माण होणारे प्रश्न सोडवायला खर्च करावी लागते…दारूमुळे सरकारला आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था यावर जास्त खर्च करावा लागतो…मनुष्यबळ कार्यक्षमता कमी होते.त्यातून आर्थिक नुकसान होते. अशावेळी दारू तून महसूल वाढतो या चुकीच्या विचारातून सरकारने बाहेर आले पाहिजे.आज गरिबांच्या अंगावर दारू पिऊन गाडीघालणारे धनदांडगे सर्वत्र दिसत असताना राज्याचे सरकार दारू विक्री वाढवावी असा विचार कसा काय करू शकते ? असा निर्णय घेतल्यास लाडक्या बहिणींची ती सर्वात मोठी फसवणूक ठरेल,त्यामुळे सरकारने तातडीने अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेवर भूमिका जाहीर करावी ..देशी दारू लायसन व विदेशी दारू लायसन वाढणार नाहीत हे लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगितले पाहिजे अशी मागणी जनसंसदचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षअशोक सब्बन नगर जिल्हा अध्यक्ष सुधिर भद्रे नगर शहर अध्यक्ष रईस शेख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा उत्पादनशुल्क मंत्री अजित पवार यांच्या कडे केली आहे




