डॉ डी वाय पाटील शैक्षणिक संकुल,आकुर्डी येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

मावळ मराठा न्यूज:-निगडी(प्रतिनिधी) आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुल येथे सर्व महिला शिक्षक, शिक्षकेतर व महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास कार्यक्रम संकुलातील सर्व पुरुष प्राध्यापकांकडून आयोजित करण्यात आला होता.सरस्वती वंदना ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.ह्यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची माहिती देणारा व्हिडिओ दाखवण्यात आला.आकुर्डी शिक्षण संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम आपल्या भाषणात म्हणाले की, “ज्या घरात महिलांचा सन्मान होतो व पूजा होते, त्या घरात सुख समृध्दी असते आणि तेथे नेहमी प्रगती होते. त्याच बरोबर त्यांनी महाभारताचा संदर्भ घेऊन महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले.सर्व महिलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक स्पर्धा व खेळाचा समावेश केला गेला होता.ह्या कार्यक्रमात पुरुष शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग बरेच परफॉर्मन्स सादर केले, त्यामध्ये नृत्य सादरीकरण या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरला.कार्यक्रमात हिंदी व मराठी गीत गायन करण्यासाठी विशेष कलाकारांना आमंत्रित केले गेले होते. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांसाठी होम मिनिस्टर चा कार्यक्रम घेऊन विजेत्यांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या.सर्व महिला कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.हा कार्यक्रमात संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम, मुख्य वित्त अधिकारी बिपिन शर्मा, संकुलातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्लेसमेंट अधिष्ठाता आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रू पट्टणशेट्टी व प्रा.वैभव वैद्य यांनी केले.हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने प्रा. छाया तिर्विर यांनी सर्व पुरुष प्राध्यापकांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page