मावळात समस्याचा पाऊसच पाऊस असतांना मावळचे जनसेवक आमदार आणि संसदरत्न खासदार नेमकं काय करताहेत?

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,काय करताय मावळचे विकास पुरुष आमदार सुनील शेळके आणि मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे? हजार कोटी निधी आणला मग विकास होताना अजून तरी दिसत नाही मग विकास नेमका गेला कुठे आणि विकास नेमका होतोय कुणाचा? एकवीरा देवीचा रस्ता आणि त्याची दुरावस्था पाणी साचून रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. मळवली नदीवरील पूलाची अवस्था बिकट रस्ता जीव घेना झालाय,नांगरगाव नदीवरील पूल? त्याची अवस्था तर पाहायलाच नको. लोणावळा आणि मावळ परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो हे माहित असून ठेकेदाराला नेमके कोण पोसतंय हे कळायला नागरिक एवढी दूध खुळी नक्कीच नाही. पाऊसाळ्यापूर्वी लोणावळा नगरपरिषदेने नेमके कोणती केली हेच कळायला मार्ग नाही कारण आताशी पाऊसाला सुरुवात झाली नाही तोच सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. अगदी पालिकेशेजारीच रस्त्यावर गुडघ्यावढे पाणी साचतंय. पर्यटन स्थळ म्हणून लोणावळ्याला कोणत्या सुविधा स्थानिक नागरिकांना मिळत आहेत? एकाच कुटुंबातील पाच पर्यटक भुशी डॅम येथे मृत्यूमुखी पडले ती त्यांचा अति आत्मविश्वासामुळे आणि प्रशासनाची चूक लपवण्यासाठी यात कारवाई मात्र झाली हातावर पोट असलेल्या छोट्या टपरी धारकांवर करण्यात आली. आमदार साहेब यांनी विधानसभा मध्ये आवाज उठवला चांगली गोष्ट आहे.मावळचे खासदार अप्पा बारणे यांनी कारवाई झालेल्या भुशीतील टपरी धारकांची भेट घेतली ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. ती लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्यच पार पाडले आहे. पण पुढे काय झाले? अपघातनंतर देखील शनिवार, रविवारी लाखो पर्यटक भुशीला येताय पण छोट्या टपरीधारकांचे पोटापाण्याचे काय? मावळ कुठेही विकासाच्या दिशेने जाताना दिसत नाहीय उलट मावळ भकास होताना दिसतोय,नेमका विकास आहे कुठे? ते जनसेवक आमदार शेळके आणि खासदार बारणे यांनी मावळातील जनतेला सांगावे. दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी मावळातील नगरपालिका यांचा निवडणुका नाहीत. त्यामुळे नगरसेवकला निदान आपल्या वार्डच्या समस्या बाबत जाब विचारता येत होता, परंतु लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांना त्यांचाच कारभार सांभाळता येत नसताना आता तळेगाव नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्या कडे दिल्याने आता नागरिकांना भेटनेच दुरापास्त होइल. विकास राहू द्या बाजूला स्थानिक नागरिकांचा समस्या तरी लोकप्रतिनिधीनी सोडवव्यात एवढीच माफक अपेक्षा मावळ वासियांची आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page