लोणावळ्यात राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते स्वामी कुवलयानंद योग पुरस्कारचे वितरण



मावळ मराठा न्यूज़, लोणावला, लोणावळ्यातील जगप्रसिद्ध कैवल्यधाम योग संस्था यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा स्वामी कुवलयानन्द योग पुरस्कार २०२३ यंदाचा पुरस्कार स्वामी रामा साधक ग्राम,ऋषिकेशचे स्वामी रीतवन भारती आणि पद्मश्री डॉ.डी आर कार्तियेन यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव सुबोध तिवारी आणि रणजीतसिग भोगल उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत ,महाराष्ट्र गीता ने करण्यात आली.राज्यपाल रमेश बैस आणि संस्थेचे मानद सचिव सुबोध तिवारी आणि मान्यवर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी तिवारी यांनी पाहुने यांचे स्वागत केले. राज्यपाल बैस यांनी कैवल्यधाम योग संस्थेचा कार्याचे तोंडभरून कौतुक केले.योग ही एक जीवन शैली बनली आहे.कैवल्य धाम संस्थे च्या कार्याचा गौरव केला . पुरस्कार विजेते यानी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे रणजीतसिंग भोगल यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन कुमारी पि दिव्या आणि रामदास यांनी केले राज्य्पाल बैस यांनी संस्थेच्या ग्रंथालय आणि इतर विभागाला भेट देवून संस्थेची आस्थेने माहिती घेतली .




