टाकाऊ साहित्याचा उपयोग करून “वेस्ट टू आर्ट” संकल्पनेतून आकर्षक सौंदर्यीकरणामुळे कचरा मुक्त चौक

मावळ मराठा न्युज – नवी सांगवी येथील GVP (Garbage Vulnerable Point) चे यशस्वी निर्मूलन करण्यात आले. यामुळे परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी बनला आहे. या उपक्रमात आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला  स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. सोनवणे म्हणाल्या कि मोकळ्या जागेत, रस्त्यावर,नाल्यात कचरा टाकू नये. घरातच ओला व सुका कचरा वेगळा करून ठेवावा आणि निश्चित वेळेत येणाऱ्या कचरा संकलन गाडीतच द्यावा. नवी सांगवी,मयूर नगरी चौक आरोग्य विभाग व बेसिक्स टीमचा जनजागृती उपक्रम कौतुकास्पद.मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की देशात आपल्याला पालिकेचा प्रथम क्रमांक येण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे आणि नागरिकांनी पालिकेला सहकार्य केले पाहिजे असे जोगदंड म्हणाले  स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची पण  चौकात कचरा न टाकण्याची जबाबदारी आहे.मुख्य आरोग्य निरीक्षक श्री. दीपक कोटियाना आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड ,महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार संगीता जोगदंड,आरोग्य मुकादम अरुण जगताप,राजाराम राखपसारे, बेसिक्स वॉर्ड इंचार्ज सुनिल धावारे, पूजा जाधव (रांगोळी सजावट), पवनकुमार रंधे, अंकुश कांबळे, रोहित सुरवसे व सागर देवकर इत्यादी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page