तळेगाव येथे इंद्रायणी इंग्लिश स्कूलने राबविले समुपदेशन सत्र


मावळ मराठा न्यूज़ :- तळेगाव ,दिनांक १६ /०९/२०२३ नुकतेच इंद्रायणी इंग्लिश स्कूल मध्ये खास मुलींसाठी समुपदेशन सत्र घेतले . जवळपास दोन तासाचे हे सत्र होते . शिक्षकांनी एकदम मैत्रीपूर्ण वातावरण तयार केले . त्यामुळे मुलींना आनंद झाला . त्यांची काळजी घेणारे , समस्या जाणून घेणारे आपले असे कोणीतरी आहे या विचारांनी मुलींना हायसं वाटलं . या सत्रात ‘वाढत्या वयात होणारे शारीरिक व मानसिक बदल ‘ याविषयी सांगण्यात आले . तसेच मुलींना येणाऱ्या समस्या , हार्मोन्स बदल त्यामुळे आपल्या वागण्यात नकळत बदल होत जातो . हा बदल नैसर्गिक आहे , हे त्यांच्या लक्षात आणून दिले . काय योग्य आणि काय अयोग्य या गोष्टीही सांगितल्या गेल्या . क्षणिक आनंदासाठी आपल्या कुटुंबाला दुःखी करणे योग्य नाही. तुम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये साथ देणारे हे फक्त तुमचे आई-वडीलच असतात , हे मुलींच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला . हे वय शिक्षण घेऊन आपल्या कीर्तीने आसमंतात भरारी मारण्याचे आहे . अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले . यावेळी कु. सायली कदम आणि कु .परा ढगे या दोन विद्यार्थिनींनी या सत्राचे महत्त्व आणि मनोगत खूप सुंदर शब्दात व्यक्त केले . यावेळी सौ. वंदना सपताळे मॅडम सौ. गौरी जाधव मॅडम सौ. गौतमी ढगे मॅडम आणि सौ. फिओना मेंडोसा मॅडम या शिक्षकांनी त्यांना समुपदेशन करण्याचे कार्य केले . या सत्राचे सकारात्मक अभिप्राय ही कांही मुलींनी लिहून दिले आहेत .




