आगामी मावळ लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर लोणावळ्यात शिवसेना उबाठाची आढावा बैठक संपन्न



मावळ मराठा न्युज :- लोणावळा,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना उपनेते मा.आ.रविंद्र मिर्लेकर , शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार मा.सचिनभाऊ अहिर,शिवसेना,पुणे जिल्हाप्रमुख मा.आमदार गौतम चाबुकस्वार ,शिवसेना संपर्क प्रमुख मावळ तालुका श्री.प्रभाकर पवार ,यांच्या मार्गदर्शनाखाली, आगामी मावळ लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर आढावा बैठक हॉटेल सिट्रस येथे संपन्न झाली.यावेळी प्रमुख उपस्थित शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटिका शादान चौधरी,पुणे जिल्हा महिला आघाडी संघटीका सौ.शैलाताई खंडागळे, युवा सेना पुणे जिल्हा अधिकारी श्री.अनिकेत घुले, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख आशिषभाऊ ठोंबरे,लोणावळा शहरप्रमुख- बाळासाहेब फाटक,मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले,समन्वयक जयवंत दळवी,महिला आघाडी शहर संघटिका कल्पना आखाडे,युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.तसेच यावेळी मनसेचे वहातुक सेनेचे अध्यक्ष अनिल कडु”यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.त्यांच्या वर देखील पक्षाने लोणावळा शहर प्रवक्ता पदाची जवाबदारी सोपविन्यात आली.लोणावळा शहर तसेच पुणे जिल्हा व मावळ तालुका युवासेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आले. या वेळी असंख्य कार्यकर्त्यांनी व युवासैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.




