विकसित भारत संकल्प यात्रा प्रकरण, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बंदी आदेश मोडला मग कारवाई एकाच गटावर का❓महाविकास आघाडीचा पोलिसांना सवाल


मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दिवशी आंदोलन करणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि त्याचवेळी महाविकास आघाडीच्या विरोध करण्यासाठी एकत्र जमून घोषणाबाजी करणारे भाजपचे कार्यकर्ते या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बंदी आदेश मोडून काढण्यासारखा एकाच प्रकारचा गुन्हा केला आहे. दोघांवर गुन्हे का नाही नोंदवण्यात आले असा असा प्रश्न महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन केला .शुक्रवारी ५ जानेवारी रोजी लोणावळा शहरात केंद्र सरकारचा विकसित भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम रेल्वे इन्स्टिट्यूट याठिकाणी सुरू होत असताना अचानक महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही स्थानीय नेते आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रम ठिकाणी जाऊन काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली होती . स्क्रिनवर ‘मोदी सरकारची हमी’ असं वाक्य लिहिलेले आहे. त्या वाक्याला विरोध करीत त्याऐवजी केंद्र सरकार किंवा भारत सरकार असा उल्लेख असावा अशी मागणी करत निषेध नोंदवण्यात आला होता. यात त्याठिकाणी दोन गट असताना व दोन्ही गट एकमेकाच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना आपण केवळ एकाच गटावर गुन्हा दाखल केला. आपण आमच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, असे आम्ही म्हणणार नाही, किंवा दुसऱ्या गटावर गुन्हा दाखल करा असे देखील म्हणणार नाही. आज आम्ही पुन्हा गर्दी जमवली, हवं तर आमच्यावर अजून गुन्हे दाखल करा मात्र अशी एकतर्फी कारवाई करू नका अशी आमची भावना असल्याचे मत लोणावळा शहर महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्याकडे व्यक्त करण्यात आले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही संकल्प रथ यात्रा रेल्वे इन्स्टिट्यूट येथे आली असता, त्याठिकाणी लोणावळा शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाऊन विकसित भारत संकल्प रथ यात्रेच्या वाहनावर भारत सरकार अथवा केंद्र सरकार न लिहिता मोदी सरकारची हमी म्हणून जाहिरात केली असल्याने त्यावर आक्षेप नोंदवत, त्याठिकाणी मोदी सरकार ला विरोध केला होता.यावेळी महाविकास आघाडीचे निखिल कवीश्वर, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब फाटक, शादान चौधरी, उषा चौधरी, संध्या खंडेलवाल, नासीर शेख, वसंत भांगरे, जितुभाई टेलर, अमोल शेडगे, राजू गवळी यांच्यासह तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावर महाविकास आघाडी च्या स्थानीय नेत्यांना यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सिताराम डुबल म्हणाले, शासकीय कार्यक्रम स्थळी विना परवाना जमाव जमवला व विरोधात घोषणाबाजी केली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे इन्स्टिट्यूट याठिकाणी लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून शासकीय कार्यक्रम सुरू होता व दुसरा गट त्यांना मदत करत होता. त्या कार्यक्रमाची परवानगी घेण्यात आली होती. असे असताना आपण तेथे जात असताना किमान पोलीस ठाण्यात कल्पना देणे गरजेचे होते. आपल्या कृत्यामुळे त्याठिकाणी दोन गटात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. यामुळे शासना तर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही एकतर्फी कारवाई नाही असे डुबल यांनी यावेळी स्पष्ट केले.




