पवना बंद जलवाहिनी रद्द व्हावी यासाठी स्थानिक संघटना सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर


मावळ मराठा न्यूज़ ,पवननगर , पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच अश्या राज्य सरकार च्या विरोधात घोषणा देत आज पवना नगर मधे बाजारपेठ येथे शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्थानिक अनेक संघटना यांनी यात सहभाग घेतला ही स्थगिती ऊठुन सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे ,त्यांची फसवणूक केली आहे, भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस ला आंदोलन घेण्याच्या नैतिक अधिकार नाही,त्यांनी आधी राजीनामे देऊन शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर यायला हवे , जर लवकरात लवकर ही स्थगिती घेतली गेली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या स्टाईल ने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला, आमदार माजी आमदार यांनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला आहे , पिंपरी चिंचवड मध्ये आनंदाचं वातावरण आहे तर मावळातील शेतकरी उध्वस्त होतोय म्हणून दुःखात आहे ,अजून किती बळी घेणार असा सवाल शेतकरी करीत आहे,अनेक जणांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले प्रशासन अधिकारी अप्पर तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च आंदोलन असल्या मुळे मोठ्या संख्येने पोलीस फ़ौज फाटा उपस्थित होता . शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी यापुढील आंदोलन पक्षा च्या मार्फत घेतले जाईल असे जाहीर केलेसर्व पदाधिकारी,शिवसैनिक,शेतकरी संघटना उपस्थित होते .




