हमाल पंचायत पुणेच्या अध्यक्षपदी, गोरख मेंगडे तर सरचिटणीसपदी अंकुश पंढरीनाथ अवताडे यांची निवड







मावळ मराठा मराठा न्यूज – पुणे -हमाल पंचायत पुणेच्या अध्यक्षपदी, गोरख मेंगडे तर सरचिटणीसपदी अंकुश पंढरीनाथ अवताडे यांची भरघोस मतांनी विजय.काल झालेल्या हमाल भवन,मार्केट यार्ड येथे हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये डॉ .बाबा आढाव यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या डॉ.बाबा आढाव निष्ठावान पॅनलने प्रतिस्पर्धी डॉ. बाबा आढाव एकनिष्ठ पॅनलचा दणदणीत पराभव करून विजयश्री एकतर्फी खेचून आणण्यात नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे व सरचिटणीस अंकुश अवताडे यांना यश मिळाले आहे.दणदणीत विजया मागचे कारण डॉ बाबा आढाव यांच्या प्रती असलेली सभासदांची सहानुभूती त्यांनी केलेले वंचित घटकासाठी काम सभासदांनी मतदानातून व्यक्त करून संपूर्ण पॅनलला निवडून दिल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी सांगितले.तर सरचिटणीस पदी निवडून आलेले अंकुश आवताडे म्हणाले की हा आमचा विजय नसून डॉ. बाबा आढाव यांनी गोरगरिबासाठी केलेल्या कामाचा विजय आहे म्हणूनच मला व माझ्या सर्व पॅनलला भरभरून सभासदांनी मतदान केले यापुढेही आम्ही संघटनेसाठी राज्यभर काम करू असे अवताडे म्हणाले. यावेळी ते म्हणाले की माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 200 मते मिळाली तर मला 1400 मते मिळाली आमचा घवघवीत विजय झालेला आहे. हा माझा विजय नसून सर्व मतदारांचा विजय आहे आणि डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांचा विजय आहे असे अंकुश अवताडे म्हणाले.उपाध्यक्षपदी सोपान धायगुडे यांची वर्णी लागली असून प्रतिस्पर्धी पॅनलचा धुराळा उडाला असून एकही उमेदवार निवडून आलेला नाही. यावेळी सोपान धायगुडे म्हणाले की आमचं पॅनल आमच्या सर्व सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आणि आमची संघटना शंभर टक्के आम्ही आमचे योगदान देऊन प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू.12 विजयी उमेदवारांमध्ये अध्यक्ष गोरख मेंगडे,सरचिटणीस अंकुश आवताडे,उपाध्यक्ष सोपान धायगुडे , गर्जे मुरलीधर,डोंबाळे दत्तात्रय,तर संघटण धायगुडे संदीप,मारणे संदीप, खजिनदार मानकर चंद्रकांत, सहसरचिटणीस फुंदे मंगेश, शिंदे विनोद, डोलारे अरुण,वत्सला गवळी या सर्वांची निवड झाली आहे. नानापेठ व पुणे परिसरात नवनिर्वाचित उमेदवार चे अभिनंदन होत आहे अंकुश आवताडे सरचिटणीस- 98220 22419



