चंद्रशेखर नथुराम खांडभोर, वय ५६ वर्षे यांचा कळकराई दरीत पडून मृत्यू


मावळ मराठा न्यूज़:- वडगाव , दिनांक २५/०९/२०२३ रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे माझा भाऊ नामे चंद्रशेखर नथुराम खांडभोर वय ५६ वर्षे, रा.नागाथली ता.मावळ जि.पुणे हा हरवले बाबत मी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. सायंकाळी ४ वा. सुमारास सावळा ता.मावळ जि.पुणे गावचे पोलीस पाटील याचेकडून मला समजले की, माझा भाऊ चंद्रशेखर खांडभोर हा कळकराई ता.माव ळ जि.पुणे येथील दरीत दगडामध्ये मयत अवस्थेत दिसला. त्यानंतर मी आमचे नातेवाईक व गावातील ग्रामस्त व पोलीस स्टाफ सदर घटनास्थळी जावून पाहणी केली असता सदरचा मयत इसम हा माझा भाऊ नामे चंद्रशेखर नथुराम खांडभोर हा असल्याचे मी ओळखले तसेच माझ्या भावाला ट्रेकिंग व झ-यात अंघोळ करण्याची आवड होती. व त्याला कोणाचाही नाद नव्हता. त्याच्या डोक्यात डोगरावरून दरड कोसळून पडलेल्या दगडाचा चंद्रशेखर याचे डोक्याला लागुन जखम झालेली दिसत आहे. सदर मयत बाँडी पावसाचे पाण्याने व प्रवाहाने फुगलेली असून अंगावरील कपडे वाहून गेल्याचे दिसत आहे. सदर मयताबाबत माझा कोणावर संशय अगर वहिम नाही.वगैरे मजकुरचे मयत रजिस्टरी दाखल करुन मयताचा पुढील पो.हवा कदम ब.नं.१६०१ हे करीत आहेत




