किसन गुंड यांची पुणे जिल्हा (उत्तर )सह संयोजक पदी नियुक्ती


मावळ मराठा न्युज :- कुसगाव बुद्रुकचे सामाजिक कार्यकर्ते किसन महादू गुंड यांना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या हस्ते पुणे जिल्हा (उत्तर )सह संयोजक पदी नियुक्ती पत्र देण्यात आले. किसन गुंड हें यापूर्वी कुसगाव बुद्रुकचा भाजपा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. तसेच त्याआधी शक्तीकेंद्र म्हणून काम केलेलं आहे.त्यामुळे त्यांचेवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाने माझेवर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरविन असा विश्वास किसन गुंड यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केला. या नियुक्तीनंतर त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे. त्यांना पुढील वाटचालसाठी मावळ मराठा न्युज कडून हार्दिक शुभेच्छा.




