राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजना,फसव्या भुलथापांचं पितळं उघडं पाडण्यासाठी देहू शहरात होऊ दया चर्चा

मावळ मराठा न्यूज़ :-देहरोड ,शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजना आणि फसव्या भुलथापांचं पितळं उघडं पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु करण्यात आलेला ” होऊ दया चर्चा ” हा कार्यक्रम शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार श्री सचिनभाऊ आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र देहू शहरातील महाद्वार चौकात व तळेगाव दाभाडे शहरातील मारूती मंदिर चौकात बुधवार दिनांक ११ आक्टोबर रोजी संपन्न झाला.शिवसेना पुणे जिल्हा संघटक स्वर्गीय ॲड अविनाश रहाणे यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..या कार्यक्रमाप्रसंगी तळेगाव दाभाडे शहरातील युवकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.या कार्यक्रमास शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख श्री प्रभाकर पवार, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटीका सौ शैलाताई खंडागळे, महिला आघाडी तालुका संघटीका सौ अनिताताई गोणते, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, सल्लागार रमेश जाधव, समन्वयक अनिल ओव्हाळ, उपतालुकाप्रमुख युवराज सुतार, तालुका सल्लागार रामभाऊ पचपिंड, देहू शहरप्रमुख बाबा भालेकर, तळेगावशहरप्रमुख शंकर भेगडे, देहू शहर उपशहरप्रमुख राजेंद्र मोरे, मा शहरप्रमुख सिध्दु नलावडे, सतिश गरूड, महिला आघाडी देहू शहरसंघटिका सुनंदाताई ढमाले,तळेगाव महिला आघाडीच्या संगिताताई सोनवणे,वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, उपशहरप्रमुख संतोष ढोरे, लोणावळा शहर उपशहरप्रमुख संजय भोईर, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, देहु शहर युवासेना मा नगरसेवक गणेश मोरे, शाखाप्रमुख महेंद्र टिळेकर, विभाग प्रमुख गणेश काळोखे, दत्तात्रय जाधव, सागर काळोखे, दिपक खेडकर, मयुर चव्हाण, यशवंत जाधव, विराज शिरोडकर,सागर जाधव, शांताराम तांबोळी, नागेश फुलारी, संतोष हजारे, मनोहर पिंगळे,लहु देशमुख, श्री घोडेकर,धीरज ठाकुर, प्रशांत शेटे,रुद्र भेगडे, दिपक घुबडे,ॲड विनायक डुबल, विजय गुंडगिरी,पंकज पाटील, महेश शिंदे, विशाल पवार, प्रथमेश सुपेकर, आकाश ओव्हाळ, राहुल अहिरे, सुनिल मुंडे, आकाश जाधव, साहिल दिवटे, संकेत खळदकर, विनय घोगरे, सुरज चव्हाण, अवि भोसले, संदिप मंजिरे, समर्थ बैरागी, करण घोडके, बबलू प्रसाद, अक्षय निंबळे, प्रतिक पेणकर संदिप गोळे, रोहित जाधव, नारायण माळी,कपिल बारवकर, सिध्दार्थ पवार,राजू मारणे,आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.श्री क्षेत्र देहू शहरातील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देहू शहर संघटक राजेंद्र काटे, सचिव माधव ढमाले व तळेगाव शहरातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा शहरप्रमुख सिध्दु नलावडे यांनी केले .तसेच या कार्यक्रमास स्थानिक श्री क्षेत्र देहू शहर व तळेगाव शहरातील नागरीक व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page