लोणावळ्यात ढोल,ताशा,डीजे,फटाके,आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करून बाप्पाची भव्य मिरवणूक काढत भक्तीपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळ्यात सार्वजनिक आणि घरगुती गणपती बाप्पाला अनंत चतुर्थीला गणेश भक्तांनी “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत दिला नयनाश्रुंनी भावपूर्ण निरोप. लोणावळ्यात ढोल,ताशा,डीजे,फटाके, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करून बाप्पाची भव्य मिरवणूक काढत भक्तीपूर्ण वातावरणात रात्री उशीरापर्यंत बाप्पाला निरोप देण्यात आला.मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी रायवूड चा मानाचा पहिला गणपती बाप्पाचे शतक पूर्ती वर्षा निमित्त पूजन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष धनंजय काळोखे यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुषगुच्छ सन्मान केला. आमदार सुनील शेळके यांनी सर्व स्वागत कक्षा ना भेटी दिल्या. लोणावळा नगरपरिषद,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट,मनसे लोणावला आणि शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे यांनी देखील गणेश भक्त यांचेसाठी स्वागत कक्ष सह सलग ३० वर्षं भंडाराची अखंड परंपरा जपत भण्डाराचे आयोजन केले. हजारो गणेश भक्तांनी या भंडाराचा लाभ घेतला. या उपक्रमाचे व महाप्रसाद वाटपाचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे, मुख्याधिकारी श्री.अशोक साबळे, उप-नगराध्यक्ष श्री. देविदास कडू, लोणावळा ग्रामीण उपनिरीक्षक भुषण माने, लोणावळा शहर पोलिस निरीक्षक श्री. सचिन पाटील, आणि ग्रामीण पोलिस निरीक्षक श्री. दिनेश तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच शिवसेना लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होते.माजी नगरसेवक नितीन अग्रवाल यांच्या सत्यनारायण चरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दरवर्षीप्रमाणे हजारो भक्तांना चहा बिस्किटे वाटण्यात आली.लायन्स् क्लब ऑफ लोणावळा खंडाळा,रामदेव भक्त मंडळ,यांनी देखील भक्तांचे स्वागत केले.वंचित बहुजन विकास आघाडी पक्षाने गणेश भक्तांना शेवकुरमुरा वाटप करत सामाजिक बांधीलकी जपली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page