१६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिना निमित्त तळेगाव शहरामध्ये मावळ तालुका आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती रॅली

मावळ मराठा न्युज- तळेगाव,(शिल्पा येवले )१६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त तळेगाव शहरामध्ये मावळ तालुका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील सर्व आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अपर्णा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैदकीय अधिकारी डॉ. भारती पोळ व तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री. डी. डी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव शहरात राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे सर्व कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली. रॅली मध्ये नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा असे आवाहन करण्यात आले, गप्पी माश्याचे महत्व सांगण्यात आले तसेच आशा सेविका व तळेगाव जनरल नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी मार्फत विविध घोषणा देण्यात आल्या व माहिती दर्शक फलक दाखविण्यात आले. ‎

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page