देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील १२ कोटी ३० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा भुमिपुजन समारंभ


मावळ मराठा न्यूज़ (शिल्पा राहुल भुंडे): देहुरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील यामध्ये कोटेश्वरवाडी,शेलार वाडी, किन्हई,झेंडेमळा , काळोखेमळा, चिंचोली, सिध्दी विनायक नगरी, पारसी चाळ,तसेच थाॅमस काॅलनी) इ. ठिकाणच्या विविध विकासकामांच्या भुमिपुजन समारंभ संपन्न झाला.तसेच किन्हई गावाचा रस्त्याचा प्रश्न खुप मोठा होता, रस्त्याची झालेली चाळण यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता परंतु ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या कामाला यश मिळाले तसेच लोकप्रिय आमदार यांनी किन्हई गावाच्या खुप वर्षे रखडुन पडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावुन किन्हई करांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. आज आमदार सुनिल शेळके यांच्या स्वागतासाठी किन्हई ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी भाषण करताना “कोणतेही राजकारण न करता आपली कामे करून घ्या”.असा संदेश ग्रामस्थांना दिला.यावेळी देहुरोड काॅन्टोमेंट बोर्डच्या माजी उपाध्यक्षा. ॲड.अरुणाताई पिंजन , संजय. ना. पिंजन यांनी आपले मनोगत मांडले. तसेच गावचे अमोल किसन पिंजन (नवनिर्वाचित पोलीस पाटील), शितल हगवणे, ज्योतीताई पिंजन, अमित पिंजन, नितीन पिंजन, संभाजी पिंजन, बाळा दिवसे , नंदु (आण्णा) पिंजन, अरुण भुंडे,सुदाम पिंजन , सचिन पिंजन, ,तेजस पिंजन, आकाश शेंडगे,व देहुरोड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रविण झेंडे, राष्ट्रवादी सरचिटणीस कृष्णाजी दाभोळे , भाजपा उपाध्यक्ष लहु शेलार , नंदकुमार काळोखे ,संदीप भेगडे, बाळासाहेब जाधव,तसेच ग्रामस्थ ,महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




