ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूल मध्ये शारदीय नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी निमित्त मातृपूजन

मावळ मराठा न्यूज़ :- लोणावळा येथील ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूल मध्ये शारदीय नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी निमित्त मातृपूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या मातांना शाळेकडून निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी औक्षण करत आपल्या मातेचे पूजन केले. मातृपूजनाच्या या सोहळ्याने विद्यार्थी व मातांचे मन गहिवरून आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका संगीता बाणाईत यांनी उपस्थितांना प्रास्ताविकात ललिता पंचमीची माहिती सांगत मातृ पूजनाचे महत्व सांगितले. तर किर्ती कुटे यांनी कविता सादर करत विद्यार्थ्यांकडून स्री रक्षणाची व मातेच्या आदराची शपथ वदवून घेतली. यावेळी विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टचे संचालक अरूण मोरे संजीव वीर आनंद नाईक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख माध्यमिक विभागाच्या उपमुख्यध्यापिका तृप्ती गव्हले प्राथमिक विभागाच्या उपमुख्यध्यापिका स्मिता इंगळे माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक यांसह विद्यार्थी व त्यांच्या माता उपस्थित होत्या. श्रीमती फातिमा डेव्हीड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आम्रपाली शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page