आषाढी वारी;आषाढ महिना म्हणजे हर्ष,उल्हास व विठ्ठल नामाचा महिमा

मावळ मराठा न्युज- (दिनांक २५ जुलै २०२६) देवशयनी आषाढी एकादशी निमित्य आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची (वाकड )सकाळी नऊ वाजता राम मंदिरापासून दिंडी काढण्यात आली ,यामध्ये महिला आणि पुरुष सभासद मोठ्या संख्येने हजर होते. पुरुष सभासदांच्या हातात पताका महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन माऊलीची मूर्ती, संत तुकाराम महाराज ची मूर्ती ,हातात टाळ मुखात विठ्ठलाचे नाम घेत फेरी काढण्यात आली .यामध्ये महिलांनी अभंग ,भजन, गवळणी, भारुड तसेच फुगड्या व फेर धरून टाळांच्या गजरात विठ्ठल नामाचे जय घोष करण्यात आले. फेरी काढताना वरूण राजा थोड्या वेळ थांबला. मंदिरामध्ये आल्यानंतर वरूण राजाचं वर्षाव सुरू झाला. राम मंदिरामध्ये आरती व मंत्रोपचार झाल्यानंतर प्रसाद व चहा सर्व सभासदांना वाटण्यात आले व शेवटी कार्यक्रमाचे सांगता झाली. या कार्यक्रमांमध्ये आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, महिला सभासद ,पुरुष सभासद मोठ्या संख्येने हजर होते.विठ्ठल !विठ्ठल!! विठ्ठल !!!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page