सडवली,मावळ ते भीमाशंकर यावर्षी रौप्य महोत्सवी दिंडीचा स्वागत समारंभ कातवी येथे उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज – मावळ,सडवली तालुका मावळ ते भीमाशंकर यावर्षी रौप्य महोत्सवी दिंडीचा स्वागत समारंभ कातवी येथे शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी अतिशय थाटामाटात संपन्न !सडवली- मावळ ते भीमाशंकर पायी दिंडी मावळातील कातवी- या गावी- नाथा मामा चव्हाण यांच्या निवासस्थानी सातत्याने गेली २५ वर्षे येते आहे. नाथांच्या परिवारासह सर्व गावकरी या दिंडीचं यथोचित मनःपूर्वक स्वागत करतात! यावर्षी दिंडीच्या पंचविस वर्षाच्या निमित्ताने- हरिभक्त परायण शामराव फाळके महाराजांच्या प्रवचना बरोबरच तळेगावचे लेखक वक्ते जेष्ठ डॉक्टर शालिग्राम भंडारींनी- लायन दीपक बाळ सराफांच्या समवेत- वारकऱ्यांशी संतवाणीच्या पवित्र अभंगातून संवाद साधला.सेवाभावी नाथा मामा चव्हाण परिवाराच्या सौजन्याने- वारकऱ्यांनी महाप्रसादाच्या आनंदाची अनुभूती अनुभवूनच या समारंभाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page