यश या ११ वर्षाच्या मुलाचा शिंग्रोबा मंदिर,कार्ला , तळेगाव प्रवास,शिवदुर्ग मित्र लोनावळा,आपदा मित्र मावळ,व वन्यजीव रक्षक संस्था यांच्या मोलाची भूमिका


मावळ मराठा न्यूज़:- तळेगाव,शनिवार दिनांक २१/१०/२०२३ रोजी रात्री उशिरा ११ ते ११:३० वाजता ऐक लहान मुलगा ऐकटाच जंगलातील जुना मुं,बई पुणे हायवेने चालत चालला होता शिंग्रोबा मंदिरा जवळ ऐका टेंपो चालकाने गाडी थांबवली व त्याला गाडीत घेतले त्याच्या मागुन मागील गाडी ने ते पाहीले तो मुलगा सांगत होता की मि ऐकविरा आई कार्ला येथे चाललो आहे काही अंतर गेल्या वर ऐका हॉटेल वर गाडी थांबली त्या मुलाला भुक लागली असावी गाडी ड्रायव्हरनी त्या मुलाला वडा पाव घेऊन देत होता त्या वेळेस मागील गाडीतील राकेश दाभाडे व सुरज दाभाडे यांनी देखील त्या मुलाची चौकशी केली व त्या गाडी ड्रॉयव्हरला सांगीतले की त्या मुलास पोलीस स्टेशन ला देऊन जाऊया रोड ने कुठेही पोलीस स्टेशन भेटले नाही गाडी सरळ कार्ला फाटा येथे पोचली त्यांने काही त्या मुलाला पोलीस स्टेशन ला घेऊन गेला नाही राकेश दाभाडे व सुरज दाभाडे हे त्यांच्या मागेच होते त्यांनी त्या मुलाला आपल्या जवळ घेतले व तसेच आपल्याला माहीत असलेले वडगाव मावळ पोलीस स्टेशन ला देऊन गेले पोलीसांनी सगळी माहिती विचारली व त्यांचा फोन नंबर घेतला व त्यांना सांगितले की तुम्ही त्या मुलाला घेऊन लोनावळा पोलीस स्टेशन ला जा रात्री खुप उशीर झाला होता.तो मुलगा सांगत होता की मला तुमच्या सोबत तुमच्या घरी घेऊन चला घरी आई वडील कोनीच नाही मामा व मामी आहे ते मला मारतील मि घरी गेलो तर तो खुप विनंती करत होता मी कुठेही काम करेल पन मला घरी जायचे नाही व तो मुलगा पन काही सांगत नव्हता .नाव सांगत होता पन पत्ता काही सांगत नव्हता रात्र पन भरपुर झाली होती परत लोनावळा ला जाने काही शक्य नव्हते त्यामुळे त्या दोघांनी त्या मुलाला आपल्या घरी माळवाडी येथे घेऊन जायचा निर्णय घेतला व त्या मुलाला आपल्या घरी घेऊन गेलेविचार पुस केली तेव्हा. मुलाने आपले नाव यश केदार गनद्रे असे सांगितले वय ११ पन घरचा पत्ता काही मुलगा काहीच सांगत नव्हता त्याला जेवायला दिले व झापवले .सकाळी ऊठल्या वर वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे सदस्य आपदा मित्र शिवदुर्ग मित्र लोनावळा चे शुभम काकडे यांना फोन करून याची माहिती दिली तसेच शुभम काकडे यांनी सगळा प्रकार वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना फोन करून सांगितले.निलेश गराडे यांनी लगेच पोलीस स्टेशन ला कळविले व त्या मुलास घेऊन तळेगाव दाभाडे येथे या असे सांगीतले व त्या मुलाचा फोटो मागीतला व तो फोटो पोलीस ग्रुप वर पाठविला तो मुलगा घरी आल्या वर त्या मुला बरोबर थोडे उलट सुलट विचार पुस केली व गप्पा मारल्या नऊ रात्री असल्या मुळे देवीची आरती सुध्दा मुलांच्या हस्ते केली मुलाला खुश केले शिवाय फटाके वाजवायला दिले तेव्हा त्या मुलाने शाळेचे नाव सांगितले व खोपोली येथे शाळा आहे असेही सांगितले निलेश गराडे यांनी लगेच त्या मुलाचा फोटो व शाळेचे नाव खोपोली येथील सहायक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर साहेब यांना माहिती पाठवली तर नातेवाईक पोलीस स्टेशन लाच बसलेले होती . लगेच मला नातेवाईक यांनी फोन केला मी त्यांना त्यांचा मुलगा सुखरूप आहे अशी माहिती दिली व माझे घरचे लोकेशन त्यांना पाठवले ते पन काही वेळातच खोपोली पोलीस राजेश चव्हाण सर व मुलाचे नातेवाईक आले व त्या मुलास खोपोली येथे घेऊन गेले तसेच यांनी आपल्या संस्थेचे आभार मानले. सदर शोधकार्या मधे शिवदुर्ग मित्र लोनावळा ,आपदा मित्र मावळ पुणे व वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश संपतराव गराडे ,शुभम काकडे,विनय सावंत ,सत्यम सावंत ,अनिश गराडे राकेश दाभाडे व सुरज दाभाडे यानी आपला महत्व पूर्ण सहभाग नोंदवला.




