बिंद्रा गणात्रा संचलित वूमन्स फाउंडेशन लोणावळा तर्फे’गौरव स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न



मावळ मराठा न्युज -लोणावळा,वूमन्स फाउंडेशनतर्फे ‘गौरव स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . ७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ९ .३० या वेळेत हॉटेल चंद्रलोक, लोणावळा येथे हा रंगतदार कार्यक्रम पार पडला.फाउंडेशन महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करत असते, यावर्षीच्या जागतिक महिला दिनानिमित्त मनोरंजन आणि ज्ञानाचा संगम असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमात सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये मनोरंजनाबरोबरच महिलांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या प्रश्नमंजुषांचा समावेश होता . तसेच नृत्य स्पर्धा आणि विशेष ज्येष्ठ महिलांसाठीही खेळांचे नियोजन करण्यात आले. यातमहिलांनी मनमुराद आनंद लुटला.या स्पर्धांमधून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. लोणावळा वूमन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष बिंदा गणात्रा यांनी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध निवेदक व गायक राजेंद्र दिवेकर यांनी आपल्या खास शैलीत हसत खेळत खेळ आणि प्रश्नमंजुषा देखील सादर केली. महिलांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवण्यासाठी या वूमन्स फौंडेशनची स्थापना केली असल्याचे अध्यक्षा बिंदा गणांत्रा यांनी सांगितले. स्थानिक महिलांसाठी दिवाळी मेळा यासारख्या उपक्रमांचे देखील आयोजन केले जाते. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्थानिक महिलांसाठी फूड स्टॉल लावण्यात आले होते.




