मावळ, मुळशीचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळुंज यांच्या आई,वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त आम्बवने येथे भव्य महाआरोग्य शिबिर



मावळ मराठा न्यूज़ :-अम्बावने,दिनांक २८ ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब ऑफ लोनावला लीजेंड्स चे ज्येष्ठ सदस्य श्री नंदकुमार वाळुंज यांच्या आई,वडिलांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. आंबवणे येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात ७२१ लोकांची तपासणी करण्यात आली.४०० लोकांची जनरल तपासणी करण्यात आली.३२० लोकांची. हाडांची तपासणी करण्यात आली.१३५ लोकांचे डोळ्याची तपासणी करण्यात आली. ६० लोकांचे दाताची तपासणी करण्यात आली.३१२ लोकांचे ब्लड शुगरची तपासणी करण्यात आली.१४८ लोकांचे ब्लड ग्रुपची तपासणी करण्यात आली.१७८ लोकांचे हाडाचा ठिसूळपणा चेक करण्यात आले.६०० रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले.६० रुग्णांची रक्ताची तपासणी करण्यात आली.३५ रुग्णांची कॅन्सर ची तपासणी करण्यात आली.५६० रुग्णांना मोफत यश हॉस्पिटल मित्र कार्ड देण्यात आलं ज्यांच्यामुळे ते पूर्ण वर्षाभरासाठी सुविधा घेऊ शकतात. रक्तदान शिबिरामध्ये वीस लोकांनी सहभाग घेतला. प्रत्येकाला पाच लाखाचे इन्शुरन्स देण्यात आले.२५ रुग्णांचे मोफत मोती बिंदु शस्त्रक्रिया पुणे येथील देसाई हॉस्पिटल येथे पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे . या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख लायन नंदकुमार वाळंज व यश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हेमंत अग्रवाल हे होते.या कार्यक्रमात वालंज शाळेचे मुख्याध्यापक देवरे सर, लायन सुरेश गायकवाड लायन अमित अग्रवाल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी. यश हॉस्पिटल लोणावळा व ओम हॉस्पिटल भोसरी. देसाई ट्रस्ट पुणे. मावळ वार्ता फाउंडेशन मनशक्ती केंद्र यांनी सहभाग घेतला.डॉक्टर मध्ये डॉक्टर राशी मोदी, डॉक्टर नेहेल खंडेलवाल, डॉक्टर सुहास गोसावी, डॉक्टर अशीता शहा, डॉक्टर राजेश चव्हाण. नंदकिशोर खंडेलवाल. ओम हॉस्पिटल ची टीम उपस्थित होती .




