किसीका दान किसीका वरदान या लायन्स क्लब लोणावळा,खंडाळा चा उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद



मावळ मराठा न्यूज़ ,लोनावला :-लायन्स क्लब लोणावळा खंडाळा चा उपक्रम किसीका दान किसीका वरदान भरभरून प्रतिसाद मिळक आहे व त्याकामी नवीन अथवा वापरण्याजोगे कपडे, सायकल, खेळणी, चीज वस्तू इत्यादी वस्तू रुपी देणग्या मिळत आहेत व त्याचे वाटप व संकलन लायन्स क्लब लोणावळा ,खंडाळा चे टेम्पोचे माध्यमातून केले जाते. दिवाळीचे औचित्य साधत मोठया प्रमाणात कपडे, सायकल, मिळाले आहेत व सदर सामानाचे नुकतेच श्रद्धा फाउंडेशन कॅन्सर रुग्ण सायन हॉस्पिटल तसेच कोकण एन. जी. ओ. रस्त्यावरील अनाथ मुले तसेच ससून हॉस्पिटल मधील नवजात शिशु व बेसहारा बालके यांना कपडे पूर्ण सेटचे वाटप करण्यात आले त्याबाबत ची माहिती लायन्स क्लब लोणावळा खंडाळा चे अध्यक्ष ॲड . प्रफ्फुल बंकटलाल लुंकड यांनी दिली व सचिव विरल गाला तसेच वा हन चालक पवन यांनी वाटप केले. या कामी क्लब सदस्यांनी मोठे योगदान दिले तसेच आपले जवळपास गरजू व्यक्ति , संस्था यांनी आवश्यक असल्यास त्याचा लाभ घ्यावा व योग्य व्यक्ती पर्यंत मदत पोहचवणे करिता संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.




