संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी कार्यशाळेत सहभागी विध्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक श्री पंकज देशमुख यांचे मार्गदशानाखाली व लोणावळा विभागाचे सहा. पोलीस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन पुणे ग्रामीण पोलीस दलाकडुन राबविण्यात येत असलेल्या संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत आज ता. १६/४/२०२४ रोजी सिंहगड इंस्टिटयुट, कुसगाव बु लोणावळा ता. मावळ जि. पुणे या संस्थेतील एकुण ८ विविध विभागाचे कॉलेजमधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कोऑर्डीनेटर, एनएसएस, एनसीसी व इतर सर्व विध्यार्थी यांचेसाठी संकल्प नशामुक्ती अभियानाचे माध्यमातुन सहा. पोलीस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक, लोणावळा विभाग, लोणावळा यांनी कार्यशाळा घेऊन सहभागी सर्व विध्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. तसेच कॉलेजमधील विध्यार्थीमध्ये वाढत चाललेले नशेबाबत विध्यार्थी व कॉलेज प्रशासनाला योग्यत्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.१) कॉलेजमधील जे विध्यार्थी दारू, गांजा, चरस, एमडी पावडर अशा विविध प्रकारचे नशेच्या आहारी गेलेले आहेत त्यांची माहिती संकलीत करणे.२) कॉलेजमध्ये अशा प्रकारची कोणी नशा करत असल्यास अथवा अशी आमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती असल्यास त्याबाबत आम्हाला वैयक्ति माहिती कळविण्याबाबत आवाहन केलेले आहे. ३) कॉलेजमध्ये समुपदेशन कक्ष (काऊसिंलीग सेल) स्थापन करून त्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, हॉस्टेलचे रेक्टर, पोलीस असे प्रतिनिधी यांची नेमणुक करणे४) नशा करणारे विध्यार्थी यांना संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अशा समुपदेशन कक्षामध्ये आणुन त्यांचे त्याठिकाणी समुपदेशन (काऊसिलींग) करणे, नशा करणारे विध्यार्थी यांचे पालकांना बोलावुन त्यांचे करवी मार्गदर्शन करणे५) कॉलेजचे मुख्य प्रवेशव्दार, हॉस्टेलचे प्रवेश व्दार व एक्झीट गेटवर तपासणी करणे ६) कॉलेज प्रशासनाचे माध्यमातून विध्यार्थी वास्तव्याचे ठिकाणी अचानकपणे भेटी देऊन अशा दारू,गांजा, चरस, एमडी इत्यादी प्रकारची नशा कोण करते आहे का याची चेकींग केली जाईल.७) कॉलेज लगत असलेली पोलीस चौकी सक्रीय करून त्याठिकाणचे पोलीस स्टाफच्या मदतीने कॉलेज कॅम्पस व हॉस्टेल परीसरात पेट्रोलींग करण्यात येईल. कॉलेजमधील विध्यार्थी यांचेवर कॉलेज प्रशासन व पोलीस प्रशासनाचे मार्फतीने विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.८) कॉलेजमधील विध्यार्थी यांना नशा पुरवणारे डिलर यांची माहिती संकलीत करून त्यांचेवर प्रभावीकायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.वरीलप्रमाणे विविध विषयांवर मार्गदर्शन करून कॉलेजमधील तरूण मुले-मुलांमध्ये वाढत चाललेली विविध प्रकारची नशा रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने संकल्प नशा मुक्ती अभियान सुरू केलेले आहे. आतापर्यन्त या अभियानामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page