नांगरगाव,वळवण ब्रिज तोडल्यामुळे पर्यायी रस्त्याची लोणावळा भाजप व विभागातील ग्रामस्थ यांची लेखी निवेदनद्वारे मागणी


मावळ मराठा न्यूज़ :- लोणावला नगरपरिषदेला लोणावला भाजप व् ग्रामस्थ यांच्या वतीने नांगरगाव, वलवन ब्रिज तोडल्यामुळे पर्यायी रस्ता करुन द्यावा यासाठी उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांचे कड़े लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी भाजप शहर अध्यक्ष अरुण लाड ,लोणावला शहर भाजप युवा मोर्चा कार्याध्यक्ष अर्जुन पठारे,हर्षल होगले,प्रदीप थत्ते ,योगेश दळवी,मारोती जाधव ,सुनील गायकवाड़ ,सचिन साठे,सुमित बलकवडे आदि मान्यवर उपस्थित होते. नांगरगाव, वलवन ब्रिज लोणावला नगर परिषदेने काढून टाकल्याने वलवन कड़े जाणारा रस्ता याचा मोठ्या प्रमाणावर वापर असल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे. तरी लवकरात लवकर नवीन ब्रिज होईपर्यंत पर्यायी रस्ता पालिकेने करुन द्यावा अशी मागणी निवेदनद्वारे अर्जुन पठारे आणि ग्रामस्थानी पालिकेला दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.




